FAQ
१) उन्हाळ्यात फळझाडे व भाजीपाला यांचे व्यवस्थापन कसे करावे?
उत्तर : इगतपुरी हवामान केंद्राच्या शिफारशीनुसार
१. उन्हाळी भाजीपाला पिकारील मावा, फुलकिडे तसेच तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस एल ५ मिली किंवाफिप्रोनिल ५ % एस.सी ३५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. २. भेंडी व टोमॅटोवरील फळ पोखरणा-या अळीचे नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ % ईसी २० मिली किंवा नोव्हॅलिरॉन १० % ई.सी १५ मिली किंवा क्लोरट्रॅनिलीपोल ८.५ % एस सी ३ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. यापैकी कोणताही एका किटकनाशकाची फवारणी करावी. ३. भाजीपाला पिकांची अधिक तापमान व उष्ण वा-यांपासुन सरंक्षण करण्याकरिता शेताभोवती मका पिकांची लागवड करावी. ४. जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने भाजीपाला व फळपिकांना काठीचा आधार द्यावा. ५. नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमा रोपांचे उन्हापासुन संरक्षण करावे. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी फळबागामध्ये गवताचे आच्छादन करावे व ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. ६. राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता फळबाग व भाजीपाला पिकांना वारंवार व हलके ओलीत करावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी अच्छादनांचा वापर करावा. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ८ % केओलीनची फवारणी करावी.
२) उन्हाळ्यात पशुसंवर्धन कसे करावे?
उत्तर : इगतपुरी हवामान केंद्राच्या शिफारशीनुसार
१. पोल्ट्री शेडच्या छपरावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे व शेडच्या भोवती गोणपाट बांधुन ओले करावे जनावरांना स्वच्छ व थंड पाणी पाजावे. २. जनावरांच्या गोठ्यांत हवा खेळती राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यांना नेहमी स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी द्यावे. 3. दुपारच्या कडक उन्हापासून व पावसापासून संरक्षण करण्यासाठी पशुधनास सावलीची व्यवस्था करावी.